किल्ले प्रतापगड येथील अफजलखानाच्या थडग्या शेजारी झालेले अतिक्रमण हटविल्याबद्दल सांगली येथे वनमंत्री ना. Sudhir Mungantiwar यांचा सत्कार आज पार पडला. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. नितिनराजे शिंदे यांच्या पुढाकाराने सदर सोहळा आयोजित करण्यात आला होता.
किल्ल्यावरील अतिक्रमण हे शिवप्रेमींना अस्वस्थ करणारे होते. अशावेळी ना. सुधीरभाऊंनी आक्रमक भूमिका घेऊन हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. या जागेवर लवकरच शिवरायांच्या कार्याची महती सांगणारे शिल्प उभे रहावे अशी शिवप्रेमींची इच्छा आहे. ना. सुधीरभाऊ याबाबत ही आग्रही राहतील याची खात्री आहे.
Users Today : 35