आज विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा मुहूर्तमेढ समारंभ मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.ना.श्री.सुधीर मुनगट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.यावेळी मला या समारंभाचे स्वागताध्यक्ष पदाचे सौभाग्य लाभले.
आद्य नाटककार कै.विष्णुदास भावे, आद्य नाट्याचार्य कै.गोविंद बल्लाळ देवल, थोर नाटककार कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर बालगंधर्व यांच्या सहाय्याने 19 व्या शतकात इथं मराठी रंगभूमीची पायाभरणी केली गेली. विशेष बाब म्हणजे ज्या पावन भूमीत पहिल्यांदा नाट्य संगीताचे स्वर उमटले गेले त्याच भूमीमध्ये ही मुहूर्तमेढ रोवली गेली याचा अतिशय आनंद आणि समाधान वाटते. सांगली ही नाट्य पंढरी आहे या भूमीने वेळोवेळी अनेक कलाकारांना प्रोत्साहन दिले. त्यांची पायामुळे येथूनच पुढे झेप घेत गेली. सांगली जिल्ह्याला नाट्य पंढरीचा वारसा लाभलेला आहे फक्त देशातच नाही तर मराठी रंगभूमीची पायामुळे देशाबाहेरही रुजलेली आहेत म्हणूनच नाट्य पंढरी असा यथार्थ गौरव केला जातो.यंदाचे हे नाट्यसंमेलनाचे शताब्दी वर्ष आहे यानिमित्ताने नाट्य कलागुणांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जातील.
याप्रसंगी मागील संमेलनाचे अध्यक्ष मा.प्रेमानंद गज्वी यंदाचे अध्यक्ष मा.डॉ.जब्बार पटेल, कामगार तथा पालकमंत्री श्री.सुरेश भाऊ खाडे ,मा. खासदार संजय काका पाटील, मराठी प्रयोग परीक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री विजय गोखले ,मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष श्री प्रशांत दामले,चित्रपट अध्यक्ष मेघराज राजे भोसले,साहित्य परिषद अध्यक्ष मिलिंद जोशी ,उपाध्यक्ष श्री नरेश गडेकर,अखिल भारतीय उपक्रम उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,श्री अजित भुरे, श्री सतीश लोटके, श्री विजय चौगुले आदी मान्यवर व अनेक रंगकर्मी कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 35