श्री.एकनाथ ‍शिंदे साहेब यांचेकडे मुंबई येथील वर्षा निवासस्थानी लेखी निवेदनाव्दारे केली.

Khozmaster
2 Min Read
राज्यातील सर्व थकित असणाऱ्या सहकारी पाणी-पुरवठा संस्थांची कर्जमाफी करण्याची मागणी तसेच कोल्हापूर जिल्हयातील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ दया अशी आग्रही मागणी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ ‍शिंदे साहेब यांचेकडे मुंबई येथील वर्षा निवासस्थानी लेखी निवेदनाव्दारे केली.
राज्यातील ग्रामिण भागामध्ये मोठया प्रमाणामध्ये सिंचन क्षेत्र वाढत असताना गावपातळीवर शेतीला पाणी-पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पाणी-पुरवठा संस्थांची स्थापना केल्या आहेत. या संस्थांतील सभासद शेतकऱ्यांनी स्व भागभांडवल उभारणी करुन उर्वरित रक्कम कर्ज स्वरुपात भू विकास बँका, स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज उभारणी करुन पाणी-पुरवठा संस्थांची स्थापना केली. परंतू कालपरत्वे या संस्थांना शेतकऱ्यांनकडून कमी प्रमाणात झालेला वसुल, वाढते वीज बिल व बँकेचा हप्ता वेळेत न गेल्यामुळे या सर्व संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. परिणामी सदरील संस्थांचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या 7/12 पत्रकी संस्थेच्या कर्जाचा बोजा बँकांनी चढविलेला आहे. त्यामुळे अशा हजारो शेतकऱ्यांना कोणतेही नविन पिक कर्ज मिळत नाही तसेच जमिनीवर कोणतेही व्यवहार करता येत नसल्याने या शेतकऱ्यांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे.
राज्य शासनाने भू विकास बँकेची केलेल्या कर्जमाफीमुळे काही प्रमाणात शेतकरी पाणी-पुरवठा संस्थांची कर्जमाफी झालेली आहे. परंतू अदयापही उर्वरित सर्व संस्था आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या असून या संस्थांची कर्जमाफी करणे गरजेचे आहे. शासनाने या संस्थांची कर्जमाफी केल्यास या शेतकऱ्यांच्या 7/12 पत्रकी असलेला बोजा कमी होण्यास मदत होणार आहे.
तसेच कोल्हापूर जिल्हयातील प्रोत्साहनपर अनुदानापासून काही तांत्रीक कारणामुळे वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपयांचा लाभ देण्याचीही मागणी यावेळी केली.
यावेळी राहुरी कृषी विदयापीठाचे अशासकिय सदस्य दत्ताजीराव उगले, शिवसेना तालुकाप्रमुख विजयराव बलुगडे, भगवान पाटील उपस्थित होते.
0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *