किल्ले शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन असंख्य संकटांनी घेरलेल्या आपल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्याचा निश्चय करत निघालेला “शेतकरी आक्रोश मोर्चा” उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सेंट्रल बिल्डिंग येथे शेतकरी आक्रोश मोर्चाची भव्य सांगता सभा होणार असून, लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ,शिवसेना नेते खा. संजयजी राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेबजी थोरात यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे.
बळीराजाच्या संघर्षाची पुढील दिशा ठरवणारी ही ऐतिहासिक सभा असून आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने या सांगता सभेस उपस्थित रहावे ही विनंती.
Users Today : 16