जुन्नर तालुक्याची पर्यटन विकास आराखडा आढावा बैठक आज तालुक्यातील आज जुन्नर येथे संपन्न झाली

Khozmaster
2 Min Read
जुन्नर तालुक्याची पर्यटन विकास आराखडा आढावा बैठक आज तालुक्यातील आज जुन्नर येथे संपन्न झाली. जुन्नर तालुक्याची महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका अशी ओळख आहे, त्यादृष्टीने तालुक्यातील पर्यटन विकासाचा आराखडा आखण्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या आराखड्यामध्ये तालुक्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात येणार आहे. या पर्यटन प्रकल्पांसाठी शासनाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देखील मिळणार असून त्यामध्ये कर्ज सवलत आणि अनुदानही मिळणार आहे. जवळपास एक ते दोन हजार कोटींपर्यंतचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असून सरकारच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी गावोगावच्या लोकप्रतिनिधी, पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते, विविध संस्था यांच्याकडून लेखी पत्र स्वरूपात सूचना आणि इतर मागण्या मागवण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा आणि सूचनांचा विचार करून त्याचा समावेश पर्यटन विकास आराखड्यात करण्यात येईल. पर्यटनाच्या विविध संधी व त्यासाठी शासनाच्या मदतीने पर्यटन विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहू असे यावेळी उपस्थितांना आश्वस्त केले.
या प्रसंगी माझ्या समवेत तहसिलदार सबनीस साहेब, BDO गरीबे साहेब, पांडुरंग पवार साहेब, देवराम लांडे साहेब, RFO चव्हाण साहेब, CO भोळे सर, उपकार्यकारी अभियंता (PWD) केशव जाधव, सहाय्यक संचालक पर्यटन विभाग पुणे चे शमा पवार, विकासशेठ दरेकर, विशाल तांबे यांसह जुन्नर तालुका पर्यटन विभागाचे पदाधिकारी, कृषि विभाग, वनविभाग, शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, पर्यटन प्रेमी उपस्थित होते.
0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *