छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅक शाखा सावळदबारा यांच्या वतीने येथील मध्यवर्ती सहकार बॅकचे कॅशीअर नामदेव चव्हाण यांचा सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम दि.२८/१२/२३ गुरुवार रोजी बॅकेत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.सावळदबारा येथे गुरुवारी सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅकचे लोन आफिससर अमोल पाटील, मॅनेजर प्रदीप रोकडे,रत्नाकर उंबरे, धनराज गवळे प्रदिप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी मयूर सोनटक्के,आफिससर काशीनाथ वावरे,माजी सभापती सांडू तडवी, नॅशनल मराठी शाळेचे प्रा. योगेश चोपडे, प्रा मदनभाऊ डोखळे,मराठी शाळेचे भागवत गायकवाड, गवळी सर, शिवाजी विद्यालयाचे विनोद जाधव सर
होते. प्रमुख पाहुणे माजी पोलीस पाटील मधुकर पाटील,पो.पा.ज्ञानेश्वर पाटील, सरपंच भागवत जाधव म्हणून यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण व पत्नी सावित्राबाई नामदेव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते सेवानिवृत्त कॅशीअर नामदेव मानसिंग चव्हाण व पत्नी सावित्रीबाईं यांचा यथोचित सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण यांच्या जीवन परिचय करून दिला तर शाखाधिकारी मयूर सोनटक्के,प्रा योगेश चोपडे, प्रदीप रोकडे व विनोद जाधवसर यांनी मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्ती सत्कार मूर्ती नामदेव चव्हाण यांच्या शिस्तबद्ध बॅकेच्या कामकाज शैली, मितभाषी कामासाठी सदैव तत्पर असल्याबाबतचे अनुभव सांगितले.उपस्थित सर्व पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण व पत्नी सावित्राबाई नामदेव चव्हाण यांना गहिवरून आपल्या कार्यकाळा दरम्यान सावळदबारा परिसरातील सहकार्य लाभल्यास्तव भावपूर्ण शब्दांत सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी उपसरपंच मो आरिफ मो लुखमान,मोहन सुरडकर,माजी सरपंच ताराचंद राठोड,सर्व पत्रकार बंन्धू, गणेश खैरे,मधुकर पुजारी,भारत नप्ते, विनोद दौलत सपकाळ, रवींद्र बावणे, स्वानंद पाटील,मुंकुदा गायकवाड,भरत चव्हाण, गणेश शेळके,प्रदीप चव्हाण, दोन्ही बॅकेचे कर्मचारी, डाभा, देव्हारी, नांदा तांडा, मोलखेडा, घाणेगांव तांडा, पिंपळवाडी, चारुतांडा परिसरातील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 36