छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर.
वैजापूर शहराचे आराध्य दैवत स्वयंभू महादेव मंदिर(वैजीनाथ महादेव मंदिर) साठी प्रा,आ,रमेश पा,बोरनारे यांनी या मंदिराच्या सुशोभीकरण साठी ₹५०लक्ष उपलब्ध करुन दिले, त्याचा भूमिपूजन समारंभ श्री, गुरुदत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला, हे हजार वर्षापूर्वी चे मंदिर आहे,एका शेतकऱ्यांला शेत नांगरत असतांना महादेव पिंड सापडली व त्या पिंडीची स्थापना शहराच्या मध्यभागी झाली,त्या वैद्यनाथ पिंडीवरून वैजापूर हे नाव या शहराचे झाले असा इतिहास सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केला, वैजाराणी यांच्या नावावरून ही वैजापूर हे नाव पडले असे मानतात असेही राजपूत पुढे म्हणाले,आ,रमेश पा,बोरनारे यांच्या सह डॉ, दिनेश परदेशी,बाळासाहेब संचेती,ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष सिद्धेश्वर साखरे,नगरसेवक डॉ,निलेश भाटिया, तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र साळुंके,शहर अध्यक्ष पारस घाटे,भाजपा तालुकाध्यक्ष नारायण कवडे ,दिनेश राजपूत,सुधाकर साळुंके,यांनी विधीवतभूमीपूजन केले,या प्रसंगी खुशालसिंह राजपूत, भगवान तांबे,हरुशेठ आसर,बाबासाहेब जगताप, रवींद्र आप्पा साखरे, प्रकाश बोथरा,स्वप्नील जेजुरकर,गणेश खैरे,इम्रान कुरेशी,सोनू राजपूत,सचिन राजपूत,विजय वेद, दशरथ बनकर,ज्योती जोशी,सुप्रिया व्यवहारे,डॉ,प्रीती भोपळे, जयमाला वाघ,प्रशांत कंगले,जितेंद्र पवार सौ,पवार,समीर लोंढे,डॉ,अश्विन जोशी,भीमा साखरे,डॉ,सोनी,जीवन राजपूत,हरीश लालसरे,राजू लालसरे, अभियंता प्रकाश पाटील, शंकर
जोरे,कपिलआसर,यांच्या सह नागरिक उपस्थित होते बाळासाहेब संचेती यांनी पांच लक्ष रुपये जाहीर केले,श्री शहाणे यांनी ही आर्थिक सहाय्य जाहीर केले,सूत्र संचलन सुशील आसर,व डी,डी, ठाकूर यांनी आभार जितेंद्र पवार यांनी मानले, विठ्ठल रूखमाई मंदिर,सभामंडप पेवर ब्लॉक, अशी कामे यातून साकारणार आहे, या प्रसंगी आरंभ पासून च्या विश्वस्त यांचे नाम स्मरण ही करण्यात आले,
Users Today : 36