प्रतिनिधी अशोक भाकरे.समिती अध्यक्ष देवेंद्र पाटील देवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये श्रावण बाळ योजना लाभार्थी ग्रामीण 227 तर श्रावण बाळ लाभार्थी शहर 117 संजय गांधी ग्रामीण 94 तर संजय गांधी शहर 75 अशि एकूण 513 प्रकरणे मंजूर करण्यात आली.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण चा निधी केंद्र सरकारकडून नुकताच प्राप्त झाल्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच या योजनेच्या या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल असे संबंधित लिपिक चारुशीला वाघमारे यांनी सांगितले.
तर सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीच्या सुरुवातीलाच मागील बाकी निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा असे अध्यक्ष देवेंद्र देवर यांनी सांगितले त्यावर नायब तहसीलदार सोळंके मॅडम यांनी जानेवारी च्या सूरवातीलाच आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करू असे सांगितले
मागील वर्षातील राहिलेल्या सर्व योजनांचे त्रुटीतील अर्जाची छाननी करून संबंधित सेतूधारकांना त्याची पुन्हा कल्पना देऊन त्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करून पुन्हा अर्ज सादर करावे असे ग्रुपच्या माध्यमातून त्यांना सूचना द्याव्या व मागील पेंडन्सी दूर करावीअसे समिती सदस्य राजेश ठाकरे यांनी सांगितले
या सभेमध्ये अध्यक्ष देवेंद्र देवर समवेत नायब तहसीलदार सविता सोळंके सदस्य राजेश ठाकरे गजानन सांगळे ,लोणकर ताई तर कर्मचारी वनिता मडावी, चारुशीला वाघमारे, सावित्री नितनवरे तलाठी एन आर पाटील श्रावण क्षिरसागर गणेश इंगळे खूळे व इतर कर्मचारी हजर होते
Users Today : 33