आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !

Khozmaster
2 Min Read

 शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण .रोजी किल्ले शिवनेरी येथून सुरू झालेला शेतकरी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व खासदार सुप्रियाताई सुळे व खासदार अमोल कोल्हे यांनी करत कधी ट्रॅक्टर व कधी बैलगाडी तर कधी पायी पदयात्रा करून हातात असूड घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक पाहिला मिळाले. त्यांच्या समवेत ( राष्ट्रवादी शरद पवार गट) शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, भारती शेवाळे ,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास काका ढमढेरे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, शिरूर तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे, शिरूर उपाध्यक्ष दिनकर पाडळे, शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे राजेंद्र लोखंडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, महिला अध्यक्ष विद्या भुजबळ, शिवसेना तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, शिवसेना नेते पोपट शेलार, तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभवजी यादव, शिरूर तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास मामा थोरात, शिरूर तालुका युवक  काँग्रेसचे संकेत गवारी, शिरूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल सातव , संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिन पंडित व असंख्य शेतकरी व महिला भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. हा मोर्चा तळेगाव ढमढेरे या ठिकाणी आला असता दुपारी जेवताना चटणी भाकरीचा आस्वाद घेतला व हा मोर्चा मार्केट यार्ड मधील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले व हुतात्मा गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे तळेगाव पेठामधून पायी चालत मांडवगण फराटा याकडे निघाला असता खोज मास्टर चे प्रतिनिधी फैजल पठाण यांनी शेतकऱ्यांविषयी कांदा प्रश्न, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विम्याचे, शेतकऱ्यांचीकर्जमाफी लाईटचे लोड शेडिंग असे काही प्रश्न विचारले व आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काही प्रश्न विचारले तसेच अजित दादा पवार यांनी केलेल्या चॅलेंज कडे तुम्ही कसे पहाता? यावेळी खासदार कोल्हे यांनी अतिशय मिश्किल टिपणी करत ,अजित दादा हे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी काय बोलणार ! असे उत्तर यावेळी त्यांनी दिले. तसेच यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या ध्येय धोरणांचा कडाडून निषेधही केला.

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *