छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅक शाखा सावळदबारा यांच्या वतीने येथील मध्यवर्ती सहकार बॅकचे कॅशीअर नामदेव चव्हाण यांचा सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम दि.२८/१२/२३ गुरुवार रोजी बॅकेत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.सावळदबारा येथे गुरुवारी सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅकचे लोन आफिससर अमोल पाटील, मॅनेजर प्रदीप रोकडे,रत्नाकर उंबरे, धनराज गवळे प्रदिप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी मयूर सोनटक्के,आफिससर काशीनाथ वावरे,माजी सभापती सांडू तडवी, नॅशनल मराठी शाळेचे प्रा. योगेश चोपडे, प्रा मदनभाऊ डोखळे,मराठी शाळेचे भागवत गायकवाड, गवळी सर, शिवाजी विद्यालयाचे विनोद जाधव सर
होते. प्रमुख पाहुणे माजी पोलीस पाटील मधुकर पाटील,पो.पा.ज्ञानेश्वर पाटील, सरपंच भागवत जाधव म्हणून यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम उपसंपादक तथा जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण व पत्नी सावित्राबाई नामदेव चव्हाण यथोचित सत्कार करुन शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन मोठा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कामाचा गोकुळसिंग राजपूत यांनी गौरव केला व सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी
परिसरातील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 36