संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ट्विटरद्वारे मी पत्र देखील लिहिले होते की, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, गुराढोऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल हा अतिशय गंभीर होताना आपल्याला सर्वांना दिसत आहे, त्यामुळे याकडे जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
शेतकरी आक्रोश मोर्चाद्वारे मी ट्रिपल इंजिन सरकारला विनंती करते की, ईडी, राजकारण कोणाची घर फोडायचे या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, राज्यातील पाणी प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न हे त्यांनी गांभीर्याने घेऊन मार्गे लावावे.
शेतकरी आक्रोश मोर्चाची बारामती येथे सभा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश मांडला.
Users Today : 33