श्रीराम जन्मभूमी अक्षदा कलश पूजन शोभायात्रेस भरभरून प्रतिसाद

Khozmaster
1 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

श्रीराम भक्तांची लक्षणीय उपस्थिती जय श्रीराम हर हर महादेव च्या घोषणांनी दुमदुमला मंठा शहराचा परिसर

मंठा शहरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलश पूजन शोभायात्रा मंठा शहरातील वार्ड क्रमांक 06 मध्ये संपन्न झाली याप्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये श्रीराम भक्तांची उपस्थिती होती श्री रामाचे अक्षदा कलश पूजन महादेव खरात पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, प्रभागातील श्रीराम भक्तांकरीता चहा पाण्याची व्यवस्था अभिषेक सांगोळे यांच्यातर्फे  करण्यात आली.
यावेळी भव्य रथातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी श्रीराम भक्तांकरिता नाश्त्याची व्यवस्था व भगवे ध्वज प्रभाग क्रमांक 06 ची विद्यमान नगरसेवक शेषनारायणजी दवणे यांच्यातर्फे करण्यात आली , तसेच शोभायात्रेच्या रथाची व्यवस्था माजी नगरसेवक नीरज सोमानी यांनी केली व संबंध नियोजन प्रभागातील सर्व सहकारी व असंख्य श्रीराम भक्त यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या शोभायात्रेदरम्यान महिलांची विशेष मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती दारोदारी महिलांनी रांगोळ्या काढून कलश यात्रेचे स्वागत केले व श्री रामाच्या जयघोषाने श्रीराम भक्त व कलश रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
जागोजागी श्रीरामाच्या व कलशाचे पूजन करण्यात आले आरती ओवाळण्यात आली याप्रसंगी प्रभागातील सर्व नागरिकांचे श्रीराम भक्तांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये श्रीराम भक्तांची उपस्थिती होती.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *