योगेश नागोलकार पातूर:- बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथे सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भीमा कोरेगाव येथील शूर वीरांची विजयस्तंभ च्या २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.२०६ व्या शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी परिवर्तन विचारमंच आयोजित कडून सर्व सेवानिवृत्त सैनिक,देशसेवेत असणारे सैनिक आजी माजी पदाधिकारी ,बौद्ध उपासक उपसिका ग्रामस्थ मोठ्या सँखणे उपस्थित राहून मांवनदना देण्यात आली. त्यानंतर घोषणा देण्यात आली नंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आली.या नंतर शौर्य दिनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ नगर ,अशोक नगर ,पंचशील नगर ,जय भीम नगर, आदींनी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे संचालन किशोर अवचार यांनी केले तर प्रास्ताविक गजानन जंजाळ,तसेच मार्गदर्शन मेजर गुलाब कांबळे प्रसिद्ध व्यख्यात श्याम देवकर यांनी मार्गदर्शन केले. आभार पंजाबराव जंजाळ यांनी मानले.
Users Today : 32