संजीव भांबोरे भंडारा प्रतिनिधी.केंद्र सरकारने कायदा केला की ड्रायव्हरने अपघात केला वर तो जर पळून गेला तर त्याला10 वर्षाचा जेल व 7 लाखाचा जुर्माना अशा पद्धतीने कायदा केल्यामुळे ड्रायव्हर लोक ड्रायव्हिंग करणारच नाही त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणारं आहे, बेकारी वाढेल कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुका सचिव शितल नागदेवे यानी एका प्रसिद्ध पत्रकात केलेली आहे यावर केंद्र सरकारने फेरविचार करावा
सविस्तर वृत्त असे की
ड्रायव्हरने अपघात केला व पळुन गेला तर 10 वर्षाची जेल व सात लाख रुपये जूर्मना अशी कडक सजा देण्यात येणार आहे
एक्याद्या गावात अपघात झाला तर पूर्ण गावातील लोक जमा होतात त्यावेळेस ड्रायव्हरला मारायला मागे पुढे पाहत नाही अशावेळी ड्रायव्हरने काय करावा आपला जीव वाचवावा की तिथे राहावं हे विचार करणे फार जरुरी आहे
ड्रायव्हर आपला जीव वाचवण्याकरिता पळून जातात हे सत्य आहे जातात कोणी आम्हाला जिवंत मारू नये ड्रायव्हर एकटा असतो त्यां लोकांसमोर एकटा काहीच करू शकत नाही अशावेळी त्यांच्या जीवाला धोका असतो जिवंत मारल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्यांना पळून जावं लागतं तो अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेऊ शकतो त्यालाही माणुसकी नावाची गोष्ट आहे परंतु उद्या तो पडून न गेला तर मग त्याला जिवंत मारला तर मग त्याला जबाबदार कोण आहे सरकार राहणार आहे या कायद्यामुळे
ड्रायव्हर या कायद्यामुळे ड्रायव्हरची बेकारी वाढेल लोक ड्रायव्हिंग करणार नाही आणि लोकांना त्रास होईल व वेळेवर ड्रायव्हर मिळणार नाही जे काही शासकीय काम व इतर जे काम आहे ते सर्व बंद पडतील काय करणार त्यामुळे विचार करायला पाहिजे आणि सर्व ड्रायव्हर लोक जे आहेत त्यांनी सुद्धा या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करायला पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुका सचिव शितल नागदेवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केलेला आहे