संजीव भांबोरे भंडारा प्रतिनिधी. बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडाऱ्याची बैठक विश्रामभवन साकोली येथे घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव सुनील डोंगरे उपस्थित होते .तर प्रमुख अतिथी म्हणून पृथ्वीराज शेंडे प्रदेश सचिव बसपा ,दादाराव उईके प्रदेश कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना 2024 च्या लोकसभा/ विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज असावे असे आवाहन एडवोकेट सुनील डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले .त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारणी विधानसभा कार्यकारणी जुनी राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बहन कुमारी मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याणकारी दिवस कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी साजरा करून पक्षाविषयी माहिती द्यावी व येत्या काही दिवसात केंद्रीय प्रभारी प्रदेश पदाधिकारी संपूर्ण विधानसभा दौरा करून सेक्टर बुथवर जाऊन पाहणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सांगितले .यावेळी पृथ्वीराज शेंडे प्रदेश सचिव ,दादाराव उईके प्रदेश कार्यकारी सदस्य यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा विधानसभा ,साकोली ,तुमसर, भंडारातर्फे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष परमेश गोणारे तथा सर्व नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .यावेळी बैठकीला निमाताई मोहरकर (रंगारी )भंडारा गोंदिया लोकसभा प्रभारी चंद्रमणी गोंडाने, जिल्हा महासचिव डॉक्टर संघरत्ने ,रवी गजभिये जिल्हा कोषाध्यक्ष, पुरुषोत्तम शहारे जिल्हा संघटक, सोपान दिवटे जिल्हा सचिव, विक्रांत भवसागर जिल्हा संयोजक बामसेफ ,धीरज गोसावी जिल्हा सचिव, अनिल वासनिकजिल्हा सचिव ,दिलीप मोटघरे माजी प्रदेश सचिव ,शंकरजी भंडारकर माजी प्रदेश सचिव, जय मेश्राम माजी प्रदेश सचिव ,सुरजभान चव्हाण जिल्हा प्रभारी, स्वप्निल बिट्टू गजभियेविधानसभा अध्यक्ष साकोली, छोटेलाल गेडाम महासचिव विधानसभा ,कार्तिक मेश्राम कोषाध्यक्ष, मनोज कोटांगले विधानसभा सचिव उमराव सेलोकर जिल्हा कार्यकारणी सदस्य ,अविनाश रंगारी, के ल गजभिये, संजय नासरे, अरविंद धारगावे, प्रियाताई शहारे जिल्हा महिला संघटक, मालाताई समुद्रेकर महिला संघटिका विधानसभा पवनी ,नितीन मेश्राम माजी विधानसभा अध्यक्ष ,सुधाकर फुले , भानक खोब्रागडे, स्वागत मेश्राम ,विजय साखरे, नितीन रामटेके ,नरेंद्र रामटेके, देवेंद्र मेश्राम, रक्षित बारसागडे, खेमराज माटे ,रोशन गजभिये ,गुजरीलाल बनसोड ,संजय मेश्राम, प्रकाश खोब्रागडे आणि सर्व आजी-माजी, जिल्हा विधानसभा ,सेक्टरबूध, महिला पदाधिकारी कार्यकर्ता , हितचिंतक बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन डॉ .संघरत्न जिल्हा महासचीव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मनोज दादा कोटांगले विधानसभा सचिव साकोली यांनी मानले.
Users Today : 24