योगेश नागोलकार राहेर:-चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान एकता अखंडतेचा संदेशपातूर तालुक्यातील मौजे उमरा येथे दि.३१ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी श्री. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून करण्यात आला अश्या या चैतन्य पुर्ण वातावरणात ज्ञानदीप इंग्लिश स्कूल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम वाघमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मेजर राजेंद्र चिपडे, सरपंच किशोर सुडोकार , माजी मुख्याध्यापक सदाशिव चिपडे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्था उपाध्यक्ष सतिष हरमकार, शिक्षक, शिक्षीका उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून एकता व अखंडतेचा संदेश विविध कार्यक्रमांतून दिला.तसेच एकांकिका नाट्य गीत नृत्य द्वारे बालगोपाळांनी रंगत आणली
या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी माता भगिनी युवा वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण चिपडे यांनी केले व सूत्रसंचालन प्रविण बोराडे, आणि आभार प्रदर्शन मॅडम सौ.शारदा डवंगे, सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी सारिका देशमुख,पुनम चिपडे यांनी प्ररिश्रम घेतले
शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.