सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा कार्य आढावा घेणारी बैठक महानगरपालिकेच्या सांगली कार्यालयामध्ये संपन्न झाली.या बैठकीदरम्यान महापालिकेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला तसेच शहर सुशोभीकरण आणि महापालिकेच्या इतर विकास कामांबद्दल आढावा घेण्यात आला .
दरम्यान मनपा आयुक्त श्री.सुनील पवार यांनी या संबंधित सविस्तर माहिती दिली.
सांमिकु महानगरपालिका क्षेत्राचा जलद गतीने विकास होण्यासाठी यावेळी प्रशासनास योग्य ते मार्गदर्शन केले व सूचना केल्या .
या बैठकीस आयुक्त श्री.सुनील पवार उपायुक्त श्री.राहुल रोकडे यांचे सह महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते .
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस अधिक समृद्ध बनवण्यासाठी मी तत्पर आहे .
Users Today : 33