वालचंदनगर येथील कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक पार पडली

Khozmaster
1 Min Read

वालचंदनगर येथील कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कारखान्याचे संचालक व कामगार संघटना यांच्यात समन्वय साधून कामगारांच्या मागण्यांसाठी सकारात्मक विचार करावा असे निर्देश दिले. यावेळी इंडस्ट्रीने कामगारांचे थकीत वेतन आणि इतर कायदेशीर देणी मिळून होणारी रक्कम तीन टप्प्यात द्यावी असे सांगितले, तसेच फेब्रुवारी अखेरपर्यंत संपूर्ण थकित रक्कम अदा करावी. शिवाय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील करार हा एक महिन्यात संपुष्टात येईल, त्याचे नुतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. तसेच कामगारांनी सुद्धा ४ जानेवारीपासून संप मागे घेऊन तात्काळ कामावर रुजू व्हावे. कंपनीने कोणत्याही कामगारावर कारवाई करू नये, अशी सूचनाही केली. सदर बैठकीस माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील, आमदार मा. उमा खापरे कामगार आयुक्त सतीश देशमुख तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *