छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.प्रा जीवन कोलते यांनी केला नामदेव चव्हाण यांचा मोठा सत्कार
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील शिवाजी विद्यालयाच्या वतीने मध्यवर्ती सहकार बॅकचे कॅशीअर नामदेव चव्हाण यांचा सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम दि.२/१/२४ मंगळवार रोजी शिवाजी विद्यालयात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.मंगळवार सत्कार समारंभाचे आयोजन प्राचार्य पंजाबराव कोलते पाटील यांच्या वतीने शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पंजाबराव कोलते पाटील व शाळेचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण व पत्नी सावित्राबाई नामदेव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते सेवानिवृत्त कॅशीअर नामदेव मानसिंग चव्हाण व पत्नी सावित्रीबाईं यांचा यथोचित सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण यांचा प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी जीवन परिचय करून दिला तर प्रा.विजयसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्ती सत्कार मूर्ती नामदेव चव्हाण यांच्या शिस्तबद्ध बॅकेच्या कामकाज शैली, मितभाषी कामासाठी सदैव तत्पर असल्याबाबतचे अनुभव काळे यांनी सांगितले.तद्नतंर उपस्थित सर्व शिक्षकवृंद,पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कारमूर्ती नामदेव चव्हाण व पत्नी सावित्राबाई नामदेव चव्हाण यांना गहिवरून आपल्या कार्यकाळा दरम्यान विविध व सावळदबारा परिसरातील सहकार्य लाभल्यास्तव भावपूर्ण शब्दांत सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी प्रा जीवन कोलते पाटील,विजयसिंग राजपूत, भास्कर खमाट, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे,श्याम जाधव, पत्रकार बंन्धू शाखेचे कर्मचारी प्रदीप रोकडे, रत्नाकर उंबरे,ओम भुगुले, धनराज गवळे, प्रदीप पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सत्कार समारंभाच्या वेळी
उपस्थित होते.
Users Today : 33