भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला मानवंदना..!!

Khozmaster
2 Min Read
दिपक मापारी  दै.खोजमास्टर वाशिम:- भारतीय बौद्ध महासभा व रामजीबाबा ट्रस्टच्या वतीने  २०६ व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा अध्यक्षा संध्याताई पंडित अमरावती विभागीय संघटक महिला विभाग भारतीय बौद्ध महासभा, तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.प्राचार्य विजय तुरुकमाने होते.प्रमुख अतिथी पी.एस.आय अजमिरे साहेब,सतीश शेवदा मुख्याधिकारी न.प.रिसोड, प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, धम्मध्वजारोहण माजी सैनिक  रामभाऊ अंभोरे, शकुंतला वानखेडे, मंदाताई वाघमारे जावळे मॅडम यांच्या हस्ते झाले, त्रिशरण पंचशील प्रमिलाताई शेवाळे, महानंदा वाठोरे यांनी घेतले,    विजय स्तंभाला मानवंदना  समता सैनिक दलाचे देवानंद वाकोडे, रामजी बानकर, गणेश कवडे, यांच्या नेतृत्वाखाली,माजी सैनिक, कपिल वाठोरे, कैलास कळासरे, गवई, रत्नपारखी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शालिग्राम पठाडे संपूर्ण कार्यकारिणी च्या वतीने मानवंदना देण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिग्राम पठाडे यांनी केले, सोनाजी इंगळे वंचित बहुजन आघाडी महासचिव वाशिम जिल्हा यांनी पाचशे पुर्वजांनी संघटीत पणे लढुन अठ्ठावीस हजार सैन्याचा पराभव केला. आता ही काळाची गरज आहे. समाज संघटित होऊन राजकीय, धार्मिक, चळवळ यशस्वी करण्यासाठी,  संघटीत व्हावे,
विजय स्तंभाला मानवंदना माजी सैनिक कैलास कळासरे, कपिल वाठोरे,बाळा रत्नपारखी,लक्ष्मण कानडे,दामोदर साहेब, गजानन गवळी, सुरेश शेंडे, प्रकाश लाटे सर्व माजी सैनिकांनी मानवंदना व पुष्पचक्र  अर्पण केले.प्राचार्य कमलाकर टेमधरे, प्राचार्य भास्कर गायकवाड, प्रा.रंगनाथ धांडे,पत्रकार विवेकानंद ठाकरे,अमर रासकर,गजानन हजारे, रवि तिडके, देवानंद मोरे, अँड सतिष पंडित, भारत खंडारे, अँड शरद मोरे,प्रा.सिद्धार्थ इंगोले,प्रा.प्रकाश हनवते , डॉ भिमराव धांडे,प्रा.नंदकिशोर खैरे,भारतीय बौद्ध महासभेचे देविदास सोनुने, नितेश नवघरे, समता सैनिक दलाचे, उषा वाकोडे,अल्का सुर्वे,नाना चतुर, पौर्णिमा अंभोरे,
गजानन खरात, भिमराव खरात,
कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी  परिश्रम राहुल जुमडे, प्रा.श्रीराम कळासरे,  प्रा.दामोदर धांडे,अजित कळासरे,जयदीप वाठोरे,सुनील गवई, कैलास धांडे,शुभम मोरे ज्ञानबा वाठोरे,
मीना चव्हाण,उषा खरात,गुंफाबाई इंगोले, वंदना मोरे, एकता नगर मधील सर्व , उपासक,उपासिका,रिसोड शहरासह, ग्रामीण भागातील व्याड,चिखली, आसेगांव,नावली,मोहजा बंदी,शेलगाव राजगुरे, पाचांबा,जांब आढाव, नंधाना ,मसला पेन इत्यादी ठिकाणी चे उपासक उपासिका सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयवंतराव हेलोडे,प्रा.अंलकार खैरे,तर आभार प्रदर्शन कैलास सुर्वे यांनी मानले. सरणतयं  मंदाताई वाघमारे,महानंदा वाठोरे यांनी घेतले,
0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *