चुकीला माफी नाही म्हणजे…… नाही…!

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी: फैजल पठाण. शिरूर महावितरण कंपनीच्या .कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचे शहर सचिव सागर घोलप हे आमरण उपोषणाला बसले होते .त्यांच्या तक्रारीनुसार ते राहत असलेल्या अपार्टमेंटचा बिल्डर ,बिल्डरचे नातेवाईक व महावितरणचा संबंधित अधिकारी यांनी संगणमत करून त्यांचे मावस भाऊ यांच्या नावावर खोटे वीज कनेक्शन दाखवू , खोटे कागदपत्र वापरून त्या आधारे बिल्डरने एक कर्ज काढले होते परंतु ते शिरूरला आल्यावर त्यांना त्यांच्या बाबत झालेला हा खोटा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्यावेळी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्या संदर्भात त्यांचे प्रशासनाचे भांडणही चालू आहे. त्यांनी हे प्रकरण त्यांच्या मावस भाऊ घोलप यांच्याकडे सोपवून ते पुन्हा परदेशी आपल्या नोकरीसाठी गेलेले आहेत त्यामुळे घोलप यांनी पाठपुरावा चालू ठेवून माहिती अधिकारातून अनेक माहिती मिळवली त्यांना अधिकारी हे दोषी आढळले, त्यात त्यांचे नाव आहे तसे पत्र त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मिळवले असल्याने न्याय मिळत नाही व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत या प्रकरणात जातीने लक्ष घालून योग्य निर्णय देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील असे सागर घोलप यांनी सांगितले सध्याचे उपकार्यकारी अभियंता जाधव यांनी उपोषण करते यांची काल प्रत्यक्ष गाठ घेऊन उपोषण स्थगित करण्याची तोंडी व लेखी विनंती केली परंतु घोलप यांनी वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवला.

   परंतु वरील विषयास अनुसरून भगवान इधाते सहाय्यक अभियंता यांच्याबाबत तक्रारीचे पत्र २८/१२/२०२३ रोजी मुख्य अभियंता परिमंडल कार्यालय बारामती येथे पाठविण्यात आले होते. सहाय्यक अभियंता यांच्यावर कारवाई बाबतचे केडगाव विभागाला प्रस्ताव देखील २८/१२/२०२३ रोजी प्राप्त झाला होता.
  परंतु प्रस्ताव  अपूर्ण असल्याने संबंधित विभागाकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त होताच संबंधितावर पुढील योग्य ती कारवाई सुरू करण्यात येईल यासाठी किमान तीन ते चार आठवडे कालावधी लागण्याची शक्यता आहे असे लेखी पत्र दिल्यानंतर श्री सागर घोलप यांनी उपकार्यकारी अभियंता श्री जाधव यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण मागे घेतले.
   येळी त्यांच्यासोबत बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज भाई सय्यद, शिरूर शहर समाधान लोंढे, आनंद नितनवरे ,विलास देठे, गुणवंत उबाळे ,श्याम भाऊ झेंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रितेशभाई , राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुका उपअध्यक्ष युवराज सोनार, भीम छावा संघटनेचे चेतन साठे, अविनाश शिंदे, राष्ट्रवादीचे हफीज बागवान, माहिती अधिकार कार्यकर्ता सागर सारंगधर, मनसेचे रवी लेंडे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
0 9 4 6 8 1
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *