आज पाहणी, आजच उद्घाटन!
कोंढवा परिसरात रस्ता करण्यासाठी आज रस्त्याची पाहणी केली. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, या भागातील नगरसेवक गफूरभाई, रईसभाई, हाजी फिरोज, हसीना भाभी, फारुखभाई इनामदार या सर्वांसह पाहणी केली.
पाहणी केली असता त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्या सकाळपासूनच काम सुरू करण्यास सांगितले. माझ्या तसेच उपस्थित नगरसेवक व अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांच्या हस्ते नारळ फोडून रस्त्याचे उद्घाटन देखील झाले. कोंढव्याच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे.
माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली कोंढव्याचा विकास हा जलदगतीने होतो आहे. यासाठी त्यांचे कोंढवावासियांच्या खूप खूप धन्यवाद!
या परिसरातील ताब्यात असणाऱ्या रस्त्याचे काम लगेच सुरू होईल तसेच ज्यांच्या जमिनी रस्त्यासाठी लागतील त्यांना कायदेशीर रित्या सर्व प्रक्रिया करून योग्य मोबदला दिला जाईल. विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. ते झालेच पाहिजेत.
Users Today : 31