मिरज MIDC मधील अंतर्गत रस्त्यांसंदर्भात आज मंत्रालयमध्ये बैठक पार पडली. सांगली जिल्ह्यातील महत्वाची MIDC म्हणून मिरज MIDC ची ओळख आहे. अशावेळी येथे उद्योजकांना उद्योग स्थापित करतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने MIDC मधील रस्ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावेत अशी MIDC क्षेत्रातील उद्योगजकांची मागणी होती. त्याची दखल घेत योग्य तो प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. उत्तम रस्त्यांच्या बांधणीमुळे इथे अनेक उद्योग येतील ज्यामुळे भागातील तरुणांच्या हाताला काम मिळेल याची खात्री आहे. सदर बैठकीस MIDC विकास आयुक्त मा. दिपेंद्र कुशवाह, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मा. संजय खांबे, उपाध्यक्ष मा. विनोद पाटील, संचालक अतुल पाटील, व्यवस्थापक मा. गणेश निकम व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Users Today : 31