निलंगा आणि देवणी तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तालुकास्तरीय ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती’च्या सर्व नवनियुक्त सदस्यांनी आज निलंगा येथील निवासस्थानी भेट देऊन आदरणीय अक्कांचा आणि माझा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
आपल्या सर्वांना मिळालेली जबाबदारी ही गोरगरिबांच्या जीवनात आनंद फुलविण्याची संधी आहे. त्यामुळे तिचा पुरेपूर वापर करून गरजू नागरिकांच्या जीवनात नवे बदल घडवून त्यांना आनंदी करा, असा सल्ला देऊन सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.