आप्पा बळवंत चौक येथील पुस्तकवाला भाई या पुस्तक दालनाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त काल भेट

Khozmaster
1 Min Read
धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील भाई अविनाश इंगळे यांच्या पुण्यातील आप्पा बळवंत चौक येथील पुस्तकवाला भाई या पुस्तक दालनाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त काल भेट दिली.
भाई अविनाश इंगळे यांनी संविधानवादी, लोकशाहीवादी व वैचारिक पुस्तकांचे दालन पुण्यासारख्या ठिकाणी सुरू करून समता, मानवता, एकात्मता हा विचार रुजविण्याचे काम केले आहे.
पुस्तकवाला भाई हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाचकांना पुस्तके पोहचवण्याचे काम करतात. ग्रंथदालनास भेट देऊन महापुरुषांच्या जीवनाचे व कृतीचे संस्कार कसे उपयुक्त आहेत हे समजते.
लोकशाही, संविधान, समता, एकात्मता व मानवता या विचारानं भारावलेल्या भाई अविनाश इंगळे यांच्या या वैचारिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहिलो. या कार्याचा आलेख असाच वाढत राहावा या सदिच्छा.
यावेळी लोकमत समूहाचे संपादक वरिष्ठ पत्रकार संजय आवटे यांचीही भेट झाली.
0 9 4 2 3 0
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *