*संघर्षयोध्दा मा.जरांगे पाटील*
*मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. या मार्गात मनोज जरांगे पाटील दोन दिवस पुण्यामध्ये थांबणार आहेत. पुण्यात एक कोटी मराठा बांधव जमा होणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.*
*मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनादरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईत किती लोक येणार? हे ही त्यांनी सांगितले. मुंबईत आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार आहे. सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.*
*असा असणार मार्ग*
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळ
_______________________