बुलडाणा, दि. 29 : जिल्हाधिकारी कार्यालयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संवैधानिक लेखा परिक्षणासाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान अर्ज करावे लागणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्याचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे अकाऊंड मॅनेजमेंट निगडीत सेवा आणि संवैधानिक लेखापरिक्षण करण्याकरीता इच्छुक निविदा धारकांकडून निविदा मागविण्यात येत आहे. सदर निविदा दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद लिफाफा पद्धतीने मागविण्यात येत आहे. सदर निविदा ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, मनरेगाची कामे करणाऱ्या सर्व यंत्रणा, पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा) यांचे लेखा परिक्षण करणे यासाठी मागविण्यात आली आहे. या निविदा दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती buldana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.