जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे भुरट्या चोरट्यांच्या मुजोरी पुढे पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील भर चौकात असणाऱ्या हनुमान मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी दिवसा फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. दि.२६ जानेवारी दुपारच्या दोन वाजेपर्यत सुरक्षीत असल्याचे राम भक्त सांगतात. त्यानंतर- ३ ते ५ वाजेदरम्यान दिवसा चोरट्यांनी ही दानपेटी फोडून त्यातील असलेला ऐवज लंपास केलेला आहे. या अगोदर ही याच मंदीरातील दानपेटी दोन वेळेस फोडल्याचा प्रकार झालेला आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीसांकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे. चोरट्यांचा त्वरीत छडा न लावल्यास समितीच्या माध्यमातुन तिव्र आदोलन छेडले जाईल. यांची दखल पोलीस अधिक्षक जळगांव यांनी घावी असा इशारा श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कमलेश चौधरी, उपा- ध्यक्ष मंगेश सरोदे, शुभम तेजकर, योगेश पाटील, ज्ञानेश्वर सोनार, अभय चौधरी, रोहीत तेजकर, पवन चौधरी आदीनी दिलेला आहे.यामुळे नागरिकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.