चिखली: 29 ऑक्टांेबर 2023 चिखली कॉग्रेस व राष्ट्रवादीचे तहसिलदारांना निवेदन, दिला आमरण उपोषणचा ईषारा
गेल्या अनेक महिन्यापासुन चिखली शहर परीसरात चालणा-या इतर छोटया मोठया अवैध धदयांसह सधन परिवाराषी संबंधीत धनदांडग्याची असंख्य तरूण मुले ड्रग्स या व्यवसनाच्या आहारी जात असल्याचे वृत्तही प्रकाषित झाले होते. मात्ऱ स्थानिक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा तसेच जिल्हा पोलीसांचे या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयात मोडणा-या ड्रग्स विक्रीकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करण्यात येत असुन राजरोसपणे राजाश्रयाने दिवसेदिवस अवैध धंदयात वाढ होत आहे. उपरोक्त विषयाचे गांर्भिय लक्षात घेत प्रषासनाने तात्काळ लक्ष घालुन अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे अषी मागणी कॉग्रेस तथा मित्र पक्षाच्या पदाधिका-यांच्या वतीने तहसिलदार चिखली यांच्या करीत कारवाई न झाल्यास अमरण उपोषणाचा ईषारा देण्यात आला आहे.
चिखली शहर कॉग्रेसचे अध्यक्ष अतहरोद्यीन काझी तसेच कार्याध्यक्ष निलेष अंजनकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिपक म्हस्के, शहर कॉग्रस शहर अध्यक्ष रवि तोडकर, माजी उपनागराध्यक्ष कुणाल बोंद्रे, युवक कॉग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, अल्पसंख्याक युवक कॉग्रेस अध्यक्ष बबलु शेख यांच्या स्वाक्ष-या असलेले निवेदन तहसिलदार चिखली यांना देण्यात आले.
चिखली शहर व परीसरात मागिल काही महिन्यांपासून पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ंसर्वच प्रकारचे अवैध धंदे वाढीस लागले असुन चोÚया व घरफोडीच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील दांगिणे, घरफोडया, शेत शिवारातील शेतमाल व जणावरांच्या चोÚया सर्व घटनांनी हैदोस घातला असुन यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्मीती होवुन असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे. चिखली शहराच्या नावलौकीकतेवर षिंतोडे उडविणा-या या वाढत्या अवैध धंदयांच्या प्रस्थाला कोणाची राजकीय वरदहस्ती प्राप्त आहे याचा छडा लावुन तपास करीत सखोल चौकषी करून कारवाई करण्याच्या मागणी बरोबरच शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातुन थेट बाजार पेठेत पसरलेले हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. यामुळे भावी युवापीढी व्यसनाधिन होवुन संस्कारविहीन होवु पाहत आहे. उपरोक्त चालणारे धंदे बंद न झाल्यास येत्या 10 फेब्रुवारी पासुन तहसिल कार्यालया समोर कॉग्रेस व मित्र पक्षाच्या वतीने अमरण उपोषण करण्याचा ईषाराही या निवेदनातुन देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलीस अधिक्ष्ज्ञक बुलडाणा तसेच चिखली पोलीस स्टेषनचे ठाणेदार यांना देण्यात आल्या आहे.
तहसिलदार चिखली यांना अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीच्या सौ. ज्योतीताई खेडेकर, विजय गाडेकर, प्रदिप पचेरवाल, बंडुभाउ कुळकर्णी, दिपक खरात, हाजी राउफभाई, राजु रज्जाक, गोपाल देव्हडे, साहेबराव डुकरे, ओमप्रकाष भुतेकर, शेख खैरू, दिपक थोरात, शहेजादअली खान, कैलास खराडे, भिका शेटे, लिंबाबापु देषमुख, डिगांबर देषमाने, राहुल सवडतकर, संजय खेडेकर, शेख जाकीर, आकाष गाडेकर, अक्षय भराड, शेख हमीद शेख अहेमद, मोहमंद साहील, भारत मुलचंदानी, संघर्ष तस्करे, फिरोज खान, अमित कोटवे, योगेष साळवे, प्रषांत चौधरी, अनिल अवसरमोल, सागर साळवे, चेतन पचलोड, प्रतिक वाकोडे, आषु थोरात, शुभम जाधव, किषोर अंभोरे, कुणाल तरमळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा …..
Leave a comment