टिटवी -पळसखेडा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील टिटवी -पळसखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात दि.२६ जानेवारी शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण गवळी व सरपंच संध्याताई भागवत जाधव यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टिटवी,प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला! शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती चैताली दीपक गौलखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले! या वेळी गावच्या सरपंच ताई संध्याताई भागवत जाधव व उपसरंच लहू राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण गवळी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेतले, यावेळी सरपंच पती श्री भागवत जाधव, ग्रामपंचायत सदस्य, दिलीप जाधव, कयूम तडवी, शालेय व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य, पोलीस पाटील डी टी राठोड,माजी सरपंच अज्ञानसिंग राठोड, ताराचंद राठोड, प्रमोद पाटील, पोलीस पाटील मधुकर पाटील, विनोद जाधव, शांताराम राठोड, निनाजी जाधव, शिक्षणप्रेमी संदीप जाधव, युवराज राठोड, विष्णू राठोड शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री मुकुंद मेमाणे सर, श्री गोपाल चांदणे  सर, श्री नितीन मोरे सर, श्री रमाकांत जाधव सर, श्री डी आर मख सर, श्री दीपक सैतवाल सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते
0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *