गजानन माळकर पाटील तालुका खोजमास्टर प्रतिनिधी मंठा
मराठा समाजाला आरक्षण बाबत निर्णय होचाच व अध्यादेश मिळतात अंतरवाली टोकवाडी येथे रविवारी ता. २८ रोजी मुख्य गावातील मंदिरा स्थळी मोठा जल्लोष करण्यात आला. डिजे च्या गजरात व फटाके फोडुन जल्लोष केला. मंठा तालुक्यातील व सर्व सकल मराठा समाज बांधव आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व समस्त समाज बांधव यांनी मागील सात महिन्यांपासून जो लढा उभारला होता त्याला यश मिळाले. आरक्षण बाबत अंतरवाली सराटी हे राज्यातील मुख्य केंद्र बनले आहे या ठिकाणी आणेक सभा, बैठाका, मोर्चा, व आंदोलन बाबत दिशा ठरवली जात होती. अखेर आज शनिवार ता. २७ रोजी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून
त्याचे अध्यादेशही काढण्यात आले व तो अध्यादेश मनोज जरांगे यांना देण्यात आला. ही घोषणा करताच समाज बांधवांनी गावात जल्लोष केला. घोषणनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू आहे. या ठिकाणी आंदोलन करीता सात महिन्यापासून किर्तन, जागर सुरू होता. आरक्षण मिळावे करीता या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ आक्टोंबर रोजी समाजाची विराट सभा संपन्न झाली होती, मनोज जरांगे यांना या गावात समाज बांधवांनी मोलाची साथ दिली. गावात मनोज जरांगे यांचे मुंबई गेलेले सकल मराठा बांधव गावात आल्यावर मोठा जल्लोष टोकवाडी सकल मराठा समाज बांधवाच्या व ग्रामस्थांनानी केला लवकरच पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे असे आपल्या भाषणात मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मनोज पाटील जरांगे यांनी आरक्षण साठी जो लढा उभारला त्याला यश आले आहे. या मुळे गोर गरीब विद्यार्थी व समाज बांधव यांना मोठा फायदा होईल. उद्धव तारख, ग्रामस्थ अंतरवाली सराटीमनोज जरांगे यांच्या प्रयत्नाला यश आले आरक्षण बाबत निर्णय झाल्यामुळे आज आमची खरी दिवाळी आहे आसे मणोगत टोकवाडी येथील सकल मराठा समाज बांधवांनी गेले.