स्वामी विवेकानंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Khozmaster
1 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा खोजमास्टर प्रतिनिधी मंठा.
स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब ताठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक माध्यमिक व पूर्वप्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले. भांगडा देशभक्तीपर गीतावर नृत्य टिपरी नृत्य लेझिम नृत्य त्याचप्रमाणे विविध देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सादर केली
यासाठी विद्यार्थ्यांना श्री वाघमारे सर . वंदना वरकड मॅडम श्री व्ही.बी.जाधव सर श्री घुगे सर श्री पी पी चव्हाण सर श्री एस आर राठोड सर श्री शेरे सर श्री खरात सर शेख मॅडम आदींनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री ठोकरे सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मोरे सर श्री रमेश राव ढवळे सर ज्येष्ठ पत्रकार श्री बाबूजी तिवारी हरिभाऊ काका चव्हाण गिरीश शेठ मूरक्या उपप्राचार्य श्री ए डी खरात सर सह शाळेतील शिक्षक व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनेक महिला व पुरुष पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही डी डोंबे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बोराडे व्ही बी यांनी केले
0 9 4 6 6 7
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *