गजानन माळकर पाटील जालना जिल्हा खोजमास्टर प्रतिनिधी मंठा.
मंठा : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत मंठा तालुक्यातील जि प प्रा शा श्रीरामतांडा शाळेत महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन व हळदीकुंकू मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात वाटूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ विद्या पालवे यांनी मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश लोमटे यांनी हा मार्गदर्शन मेळावा घेण्याचा उद्देश आपल्या प्रस्ताविकेतून सर्व महिला व किशोरवयीन मुलींना समजून सांगितला. त्यानंतर डॉ विद्या पालवे यांनी मासिकपाळी व्यवस्थापन अंतर्गत मासिकपाळीच्या काळात होणारे शारीरिक व मानसिक बदल,होणारा त्रास तसेच मासिकपाळी काळात घ्यावयाची काळजी व काळजी न घेतल्यास होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका सुषमा शेळके व सुनीता दुभळकर यांनी सर्व महिलांना वाण देऊन मकरसंक्रांतिनिम्मित हळदीकुंकू कार्यक्रम घेतला. हा मेळावा संपन्न करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश लोमटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद चव्हाण, श्रीकांत अंबुरे,सुषमा शेळके, सुनीता दुभळकर,मीरा चव्हाण व उषा चव्हाण यांनी प्रयत्न केले. मेळाव्याचे सूत्रसंचलन श्रीकांत अंबुरे व आभारप्रदर्शन सुषमा शेळके यांनी केले.