विचार ..
स्वावलंबन शिकवी
गांधीजींचा चरखा
प्रगती चाके फिरती
कुशल होतो नवखा
विचार असावे उच्च
रहाणीमान न् साधी
भारताभिमान सांगे
महात्माजींची खादी
अहिंसावाद जाणते
गांधींची सक्षमकाठी
अदृश्य राहून करते
वार इंग्रजाचे पाठी
बापूंजींचे चष्म्यातून
मिळे आधुनिक दृष्टी
गांधीविचार आणता
विलोभनीय रे सृष्टी
शतक लोटले तरीही
बापूजी विचार ताजे
आचरणात आणता
म्हणूं गांधींजी माझे
सत्याग्रहाचा अनुग्रह
सोडूया हिंसा स्वार्थ
समजून घ्यावे गांधी
तेव्हांच साधेलं अर्थ
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
Users Today : 1