मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज. (चिखली):—खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या सत्याग्रह साखळी उपोषणाचा २९ जानेवारी रोजी अठरावा दिवस होता या दिवशी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व नागरिकाकडून आंदोलन कर्त्याची भेट घेऊन खामगाव जालना रेल्वे रेल्वे मार्गासाठी या मार्गाला राज्य शासनाने ५०% राज्य हिस्सा त्वरित मंजूर करावा या मागणीसाठी रेल्वे आंदोलन समिती सुरू केलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत. दिवसेंदिवस हा पाठिंबा वाढत असून शासनाने आंदोलनाची त्वरित दखल घेऊन राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी ५० राज्य हिस्सा त्वरित मंजूर करावा .अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून आता जोर धरत आहे. चिखली तालुका वकील संघ महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्ष भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्षाच्या महिला आघाडी तर्फे या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त करण्यात आला. असून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी आता सर्वसामान्य जनतेतून जोर धरत आहे.
Users Today : 7