Friday, September 13, 2024

आदिवासी”कोळी महादेव”जमातीच्या उपोषणाला तथागत ग्रुपचा जाहीर पाठींबा

अकोला- तथागत ग्रुप अकोला जिल्हाच्यावतिने  आदिवासी”कोळी महादेव”जमातीच्या उपोषणाला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख मा.श्री.सुनिल वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसलेले आदिवासी”कोळी महादेव”जमातीचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली असता त्यांच्या सोबत चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली व त्यांची जात प्रमाणपत्राची मागणी योग्य असून त्यांच्या मागणीनुसार आदिवासी”कोळी महादेव”जात प्रमाणपत्र मिळणे संदर्भात भव्य आक्रोश मोर्चा काढण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे हजारोच्या संख्येने आदिवासी”कोळी महादेव”जमातीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतिने भक्कमपणे”जाहीर पाठींबा”देण्याचे आश्वासन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदीपभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अविनाशभाऊ कांबळे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.श्री.सुनिलभाऊ वनारे,अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष अख्तर कुरेशी, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष गौतम नरवाडे,अकोला जिल्हा अध्यक्ष कामगार विभाग गणेश निळे, मधुकर बुंदे,गजानन गोजे,अजय उपरक्ट आदी पदाधिकारी व सदस्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang