Tuesday, October 15, 2024

केळवदचे शिवाजीराव कालेकर, बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी .सुदैवाने प्राण वाचले!

मन्सूर शहा दै.खोज मास्टर न्यूज (चिखली):—म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी” बिबट्याने हल्ला चढविला ! पण सुदैव… केळवदचे शिवाजीराव सुखरूप !

केळवद येथील शेतकरी शिवाजी पंढरीनाथ कालेकर यांचे अंत्री शिवारात शेत आहे. काल १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गव्हाला पाणी देत असतांना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. बिबट्याने कालेकर यांच्या हनुवटी व छातीवर हल्ला चढविला, यावेळी त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली, बिबट्याने तेथून पळ काढला अश्या प्रकारे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. बिबट्याने विचार केला असता तर.. आरडाओरड केली तरी सुद्धा त्यांना मोठी हानी झाली असती. मात्र बिबट्याचा विचार बदलला आणि त्याने तेथून पळ काढला.
कालेकर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर तात्काळ गणेश कालेकर, गणेश पांढरे, गोपाल कालेकर, सनी पांढरे, उदय पाटील यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. बुलडाणा येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे व कर्मचारी यांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला. हिंस्त्र वन्यप्राण्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे. केळवद, अंत्री व आजूबाजुच्या परिसरात अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. हरीण, रोही, कोल्हे हे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करुन त्यांना जेरबंद करण्याची मागणीशेतकरी बांधवांकडून होत आहे..
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang