- आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी आणि हातावर सुनिल तिफणे यांना सोडू नये ठेवले लिहून*
अवैध सावकार तिफणेंवर कोणती कारवाई होणार याकडे लागले संपूर्ण बुलढाणा जिल्हा वासियांचे लक्ष
खोजमास्टर-वृत्त संकलन.
मेहकर:-मेहकर तालुक्यातील उकळी सुकळी येथील उध्दव मानवतकर या युवा शेतकऱ्याने मेहकर येथील अवैध सावकारी करणारे सुनिल तिफणे पाटील यांच्याकडून काही १८-१०-२०२२ रोजी व्याजाने वीस हजार रुपये घेतले होते आणि त्यातील दहा हजार रुपये परत केल्यानंतर सुध्दा अवैध सावकार सुनिल तिफणे पाटील व त्यांचा मुलगा अमर तिफणे पाटील यांनी उध्दव मानवतकर यांना तुमच्याकडे आमचे नव्वद हजार रुपये असल्याचे धमकावले व उध्दव मानवतकर यांच्या गाडीच्या चाब्या हिसकावून घेतल्या आणि आठ दिवसांत पैसे आणून न दिल्यास उकळी येथे येऊन अपमानित करण्याची धमकी दिली आणि विशेष म्हणजे उध्दव मानवतकर यांना त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरातून धक्का बुक्की करुन गाडीच्या चाब्या हिसकावून घेतल्या आणि पुनःश्च घरी येऊन मारण्याची धमकी दिल्याची चिठ्ठी ठाणेदार मेहकर व बीट जमादार उकळी यांच्या नावाने लिहून ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली आणि विशेष म्हणजे हातावर सुध्दा सुनिल तिफणे पाटील यांना सोडू नये असे लिहून ठेवले यापूर्वी सुध्दा अवैध सावकारी करणाऱ्या तिफणे यांनी धमकावल्याच्या अनेक तक्रारी असून यामध्ये आजरोजी उकळी येथील उध्दव मानवतकर या युवकाचा नाहक बळी गेला असून त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेले अवैध सावकार सुनिल तिफणे पाटील व त्यांचा मुलगा अमर तिफणे पाटील,व पुतण्या गणेश तिफणे पाटील यांच्यावर काय कारवाई केली जाईल याकडे मेहकर तालुक्यातील जनतेसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले असून मयताचा मुलगा ज्ञानेश्वर मानवतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अपराध क्रं ७५/२०२४ नुसार आरोपी सुनिल तिफणे पाटील,अमर सुनिल तिफणे,गणेश दत्तात्रय तिफणे रा मेहकर यांच्यावर भा.द.वि.कलम ३०६ व ३४ कलमान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वसंत पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.