एन एम एम एस परीक्षेत महान केंद्राची उत्कृष्ट भरारी

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी बार्शीटाकळी-निंभरा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले 97 टक्के गुण घेवून उत्तीर्ण प्रतिनिधी एन एम एम एस परीक्षा चा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत येणाऱ्या महान केंद्रातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भरारी घेतली आहे सदर परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळा निंभारा यांनी प्रथम क्रमांक पटकावून सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गजानन महाराज विद्यालयातील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हा परिषद शाळा महान मराठी येथील दोन विद्यार्थी बाल शिवाजी इंग्लिश स्कूल मधील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे कोणतेच प्रकारे खाजगी कोचिंग न लावता विद्यार्थी सदर परीक्षा उत्तीर्ण झाले आहे सदर विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद शाळे येथील विद्यार्थी सदर परीक्षेत गेल्या तीन वर्षांपासून सतत उत्तीर्ण होत आहे सदर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावा व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याकरिता महान केंद्राचे माजी केंद्रप्रमुख डॉ शाहिद इक़बाल खान सरफराज खान प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले जि प शाळा निंभारा येथे आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्र प्रमुख डॉ शाहिद इक़बाल खान सरफराज खान प्रमुख उपस्थित म्हणून नितेश भाऊ खरात सरपंच निंभारा देवचंद नानोटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती निम्भारा दादाराव भाऊ नानोटे सदस्य निमभारा हे होते या शाळेतील सुपेश संजय सुलताने यांनी 97 टक्के गुण प्राप्त झाले असून श्रावणी गजानन नानोटे 84% आसशे सतीश मते 83% दामनी देवमन नानोटे 77% आदर्श विलास बर्डे ७७ टक्के कृष्णा शालीग्राम खाडे प्रतीक विजय इंगळे 59% गुण प्राप्त केले असून सदर शाळेचे मुख्याध्यापक विजय टपके यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षक गजानन भगत संदीप पालवे यांनी विशेष मेहनत विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना सदर यश प्राप्त करून दिली आहे तसेच जि प शाळा महान मराठी येथे नम्रता गणेश नागिले श्रद्धा उमेश उमाळे हे दोन विद्यार्थी सदर परीक्षा उत्तीर्ण झाले असून सदर शाळेचे मुख्याध्यापिका सुरेखा भोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती नालींदे रूपाली वारकरी यांनी विशेष मेहनत घेतली आहे तसेच गजानन महाराज विद्यालय महान येथील सहा विद्यार्थी सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले असून शाळेचे मुख्याध्यापिका वंदना प्रकाश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थ्यांना सदर परीक्षेमध्ये यश मिळवून दिले आहे तसेच बाल शिवाजी शाळेचे संस्थापक अध्यक्ष किशोर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सपना सुपनेर यांनी सुद्धा विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना सदर परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत केली आहे सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्षाची पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असून सदर विद्यार्थ्यांचे सारथी मध्ये निवड झाल्यास त्यांना बारा हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होते.

महान केंद्रातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षेत यश मिळाले हे महान केंद्रासाठी कौतुकस्पद बाब आहे. उपरोक्त सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक हे विशेष वर्ग घेऊन विशेष मेहनत घेत आहे कोणतीही खाजगी कोचिंग न लावता विद्यार्थ्यांना यश प्राप्त करणे ही अभिमाना ची बाब आहे याकरिता सर्व शाळेतील मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांचे हार्दिक अभिनंद,डॉ शाहिद इक़बाल खान एस   मा केंद्र प्रमुख महान केंद्र पंचायत समिती बार्शीटाकळी

0 9 4 6 5 7
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *