शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराम तांडा शाळेचे घवघवीत यश.

Khozmaster
1 Min Read
केंद्रातून वेदांत लोमटे सर्वप्रथम तर आस्था इसनकर द्वितीय
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,श्रीराम तांडा ता मंठा या शाळेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. त्यामध्ये वेदांत लोमटे(216), आस्था इसनकर(212), तेजस्विनी नानवटे(156), प्रसेनजीत नितनवरे(150),महेंद्रपाल जाधव(132) हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
                 विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थी वेदांत लोमटे याने 216 गुण घेऊन इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत केंधळी केंद्रातून सर्वप्रथम तसेच आस्था इसनकर हिने 212 द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश लोमटे व वर्गशिक्षिका श्रीम सुषमा शेळके यांनी वर्षभर शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय प्रवेश परीक्षेचे नियमित जादा वर्ग तसेच सराव परीक्षेची शृंखला घेतली व सर्व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळेच हे घवघवीत यश मिळाले आहे.
          या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके, शिक्षणविस्ताराधिकारी के.जी.राठोड,केंद्रप्रमुख रामेश्वर शिंदे,केंद्रीय मुख्याध्यापक विलास माथने,विनोद चव्हाण, डिगंबर चव्हाण,शिवाजी चव्हाण, संजय चव्हाण,सुनीता दुभळकर,श्रीकांत अंबुरे व सर्व पालक यांनी अभिनंदन केले.
0 9 4 5 5 2
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *