छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव, सिल्लोड व सावळदबारा परिसरात जालना लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सोयगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद निहाय प्रत्येक गावामध्ये प्रत्यक्ष भेटी घेऊन महाविकास आघाडीला मत द्या असे आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले येत असल्याची रवी काळे सोयगाव तालुका अध्यक्ष यांनी दिली. याप्रसंगी डाभा, मोलखेडा, हिवरी, चारुतांडा,जामठी, घाणेगाव तांडा, टिटवी, पिंपळवाडी,पळसखेडा नांदा तांडा,
देव्हारी,जंगलातांडा,बनोटी,जरं डी,पळसखेडा,रवळा, जवळा फर्दापूर तसेच विविध गावात जाऊन पक्षाची विचार धरणी पक्षाचे विचार काय आहेत आगामी निवडणुकीत पक्षाची ध्येय काय हे महाविकास आघाडीतर्फे या भेटी घेत मतदारांनसमोर मांडण्यात येत असल्याची सोयगाव तालुका अध्यक्ष रवी काळे यांनी सांगितले.याप्रमाणे महाविकास आघाडीतर्फे नेत्यांकडून
येणाऱ्या १३ मे तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान देखील रवी काळे यांनी केले आहे .याप्रसंगी सोयगाव मतदार संघातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जनसंवाद यात्रेनिमित्त उपस्थित अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल मा.विलास बापु औताडे, विधानसभा संघटक अक्षय खेडकर, शिवसेना तालुका प्रमुख शंकरराव ठोंबरे, काँग्रस तालुका अध्यक्ष संतोष शेजुळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र साळुंके, जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ शिंदे, सोयगाव मधील पदाधिकारी डॉ इंद्रजित सोळंके राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोयगाव तालुका अध्यक्ष दिलीप मचे, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे, सोयगाव शहर अध्यक्ष दिनेश हजारे, सोयगाव शहर प्रमुख रवी काटोले, शहर प्रमुख रवी काळे,, पत्रकार भरतभाऊ पगारे, एकनाथ गोंड ,दिलीप देशमुख, सुनील माकोडे, प्रमोद कोते, रवींद्र गायकवाड,मुक्तार तडवी,सागर जैस्वाल सोयगाव व सावळदबारा परिसरातील पदाधिकारी यांनी मतदार बंधु भगिनींच्या भेटी घेत डॉ. कल्याण काळे यांच्या विजयासाठी जोरदार कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे.