रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही सदर आशयाचा फलक प्रदर्शित करा
सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या तक्रारी ची दखल
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, अकोला यांचे आदेश
अकोला प्रती – कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तेथील औषधी दुकानातूनच औषध घेण्याची सक्ती रुग्णालयाकडून केली जाते यामुळे अनेक तक्रारी वाढल्या होत्या त्याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने ही सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्याआधी रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती करत अनेकांनी फलक लावणे बंधनकारक समजले नव्हते त्यामुळे बाहेरील एखाद्या औषध विक्रेत्याकडे कमी किमतीतील उपलब्ध असलेले हीच औषधे येथे चढ्या भावात विकत घ्यावी लागत होती त्यावर आता उपाय शोधत रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानातूनच औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला दरम्यान आता या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा मिळणार असून औषधे आणि औषध आणी सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अन्वये अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए )कडून याबाबतचे आदेश प्रस्तुत करण्यात आले आहेत तरी या निर्णयाबाबत सर्व रुग्णालय आणि नर्सिंग होम यांना असे फलक लावणे आता बंधनकारक होणार आहे रुग्णांलयाशी संलग्न औषध दुकानातूनच औषधी खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे. अशी मागणी सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी तक्रारी द्वारा केली होती.त्यांच्या तक्रारीची दखल घेत अध्यक्ष/सचिव, जिल्हा केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटना अकोला व वाशिम यांना सदर आशयाचा फलक रुग्णालयाशी संलग्न पेढयांमध्ये प्रदर्शित करण्याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, अकोला आदेश दिले. त्यानुसार त्यांच्या सदस्यांनी सदर फलक दुकानात व रूग्णालयात लावण्याचे काम सुरु केल्याचे कळविले आहे. उमेश इंगळे यांच्या मुळे रुग्णांना आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे