शिर्डीला जाणारी बस थांबवली, तपासणीवेळी विचित्र वास, बॅग उघडताच सारे हादरले

Khozmaster
2 Min Read

धुळे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगावबारीजवळ देखील एक पथक स्थिर पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये पैशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होणार असून याला आळा घालण्यात यावा याकरिता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशीच चौकशी सुरू असताना नगावबारी परिसरात तैनात असलेल्या पथकाने खरगोन ते शिर्डीकडे जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या बसमध्ये त्यांना लाखो रुपयांचा गांजा आढळून आला आहे.

देवपूर परिसरात असलेल्या नगावबारी जवळ तैनात करण्यात आलेल्या स्थिर पथकाने खरगोन ते शिर्डी जाणारी बस थांबवली आणि या बसची तपासणी सुरू असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अमली पदार्थांचा वास आल्याने त्यांनी या बसची कसून चौकशी केली. असता एका इसमाच्या बॅगमधून त्यांना तब्बल लाख रुपयांचा गांजा मिळून आला.दरम्यान, देवपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेतला असून हा माल कुठून व कोणाकडे जात होता याची कसून चौकशी करीत आहे. तसेच यामध्ये अजून आरोपींची वाढ होऊ शकते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *