भरधाव ट्रकची उभ्या ट्रकला धडक; तिघेजण गंभीर जखमी

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव :

अकोला रोडवरील नवीन बायपासवर हॉटेल रुचिरा जवळ शनिवारी १७ मे रोजी सायंकाळी भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले.

माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमपी-०९-एचएच-४५४० हा नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, खामगावकडून अकोलाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच-१९-सीएक्स-२९३५ च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकला जोरदार धडक बसली.

या अपघातात अझरुद्दीन रफिउद्दीन शेख (वय ३२), सुमेरसिंग राजपूत (वय ४५, रा. वरणगाव) आणि शेख अमिर शेख मोहम्मद (वय ६३, रा. मध्यप्रदेश) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

0 9 7 3 3 4
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *