तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांचा रिपाई (आठवले) गटात पक्षप्रवेश व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून पाठिंबा जाहीर..!

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा

जिल्ह्यामध्ये इतर पक्षांचा पक्षप्रवेश सोहळा दणक्यात सुरू असताना आता रिपाई आठवले गट सुद्धा यामध्ये आघाडीवर आहे. सामाजिक न्याय विभाग भारत सरकार मंत्री मोहदय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक 18 मे रोजी नागपुर रविभवन येथे आण्णासाहेब मुळे, भाई दिलीप खरात यांच्यावर विश्वास ठेवुन संदिपभाऊ गवई यांनी रिपाई आठवले गटात पक्षप्रवेश केला. संदिपभाऊ गवई हे नेहमीच गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात. यावेळी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये सामाजिक न्याय विभाग भारत सरकार मंत्री मोहदय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पक्षप्रवेश व महाराष्ट्र राज्यातुन जाहिर पाठिंबा दिला त्यामुळे महाराष्ट्र राज्यात विशेषत्वाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिपाई आठवले पक्षाची ताकद आता वाढणार आहे. नावलौकिक असलेले युवा तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी रिपाई आठवले गटात
पक्षप्रवेश व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन पाठिंबा जाहीर केला आहे. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून आपले जाळे उभे केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर पातळीवर सामाजिक उपक्रम विविध ठिकाणी घेत आसतात यामुळे मोठ्या संख्येने युवक युवती व पुरुष व महिला तथागत ग्रुपमध्ये सहभागी होत आसतात. याचाच फायदा नक्कीच पक्षाची ताकद वाढण्यासाठी होईल. त्यांच्या समवेत आण्णासाहेब मुळे, भाई दिलीप खरात, दिलीप काकडे, शरद अंभोरे, पवन साळवे, आकाश साळवे, सुधीर हिवाळे, कुणाल माने, आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपाई आठवले गटामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत नागपुर रविभवन येथे पक्ष प्रवेश केला आहे.

0 9 7 3 3 2
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *