तलावातील गाळात अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव :

पोहण्याचा मोह एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे शिवारात घडली. तलावात पोहत असताना गाळात अडकल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, समर्थ मंगलसिंग पवार (वय १३) हा १८ मे रोजी सकाळी शेळ्या चराईसाठी जयपूर लांडे शिवारात गेला होता. यावेळी परिसरातील फादर कॉलनी तलावात तो पोहण्यासाठी उतरला. पोहत असताना तलावातील खोल खड्ड्यातील गाळात तो अडकला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला.

घटनेनंतर त्याला तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी निशांत प्रतापसिंग पवार (वय ३०) यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १७४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मधुकर पवार करीत आहेत.

0 9 7 3 3 4
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *