शेरी येथे पुर्ववैमनस्यातून मारहाण

Khozmaster
1 Min Read
 जामनेर विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेरी येथे पुर्व वैमनस्याचे कारण पुढेकरून एकास टोकदार  हत्यारासह लाठ्या -काठ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच   घडली.याप्रकरणी शुभम संजय पांढरे (वय २५ रा.शेरी )  यांनी फिर्याद दिली असता  कृष्णा टेंभू पांढरे,उमाकांत कृष्णा पांढरे,पांडुरंग कृष्णा पांढरे सर्व रा. शेरी यांच्या विरूद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शुभम पांढरे यास मागील भांडणाच्या कारणावरून टोकदार हत्याराने व लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.याप्रकरणी फिर्याद दाखल होऊन तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले .पोलीस कस्टडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीनही आरोपींना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उमाकांत पांढरे व पांडुरंग पांढरे यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून कृष्णा पांढरे फरार आहेत.उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे ,पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सचीन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय भरत दाते हे करीत आहेत.
0 9 3 8 2 2
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *