अखेर मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नियुक्त

Khozmaster
2 Min Read
सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या तक्रारीची दखल
 अकोला प्रती – श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे बाल रुग्णाची होणारी गैरसोय  थांबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा उमेश इंगळे यांनी केली होती. शहरासह तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी आधारवड असलेल्या निःशुल्क सेवा देणाऱ्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुणांची तपासणी होत असून बालरोग तज्ञ डॉ नसल्याने शिशुसह बाल रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सुमारे दोन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासह मंडळ निहाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यरत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजीवाहक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहेत यामध्ये काही रिक्त पदांचा तुटवडा आहे रुग्णसेवेत याचा परिणाम होताना दिसतआहे आणि कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचेचर सेवेचा ताण पडत असूनही आपली सेवा ही रुग्णांकरिता प्रामाणिकपणे देत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी प्रस्तुती विभाग कार्यरत असल्याने ह्याठिकाणी शिशुंची काळजी घेण्याच्या दृष्टीने बालरोग तज्ज्ञ डॉ असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.  यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व त्यांची २५ उपकेंद्र आहे.  सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी निवेदन तथा तक्रार देऊन मागणी केली होती. त्यांच्या तक्रारुची दखल घेत डॉ मोहम्मद जुबेर ईक्बाल, वैद्यकिय अधिकारी (बालरोग तज्ञ), यांची सद्यस्थितीत ल.दे. उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर जि. अकोला येथे वैद्यकिय अधिकारी (बालरोग तज) उपलब्ध नसल्यामुळे व सदर रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे बाल रुग्णांची गैरसोय होणार नाही.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *