अकोला प्रति – दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे नुकतेच अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असतांना शिक्षक कॉलनी कौलखेड अकोला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात कार्यरत किशोर अडागळे यांना राष्ट्रपति शौर्य पोलीस पदक मिळाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हाच्या वतीने सत्कार घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आपला जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या भारतीय सैनिकांमुळे देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे. किशोर अडागळे यांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक मिळाले हे अकोल्यासाठी गौरवाची बाब आहे. असे गौरव उद्गार काढून त्यांनी किशोर अडागळे यांचा सत्कार केला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण जिल्हा कार्याध्यक्ष देवीलालजी तायडे, महासचिव एम. एम . तायडे , महानगर अध्यक्ष सुनिल सिरसाट , महिला जिल्हाध्यक्षा राजकन्या सावळे , महिला महानगर अध्यक्षा शोभा वानखडे , उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे , यशवंत इंगोले , सुनिल तायडे , सचिव दयाराम तायडे , कोषाध्यक्ष प्रदिप धांडे , विधी सल्लागार ॲड चंद्रशिल दंदी ,सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे, लॉर्ड बुद्धा फांऊडेशन अध्यक्ष इरभानजी तायडे , संस्कार विभाग प्रमुख भन्ते विजयकिर्ती , संघटक डॉ . राजू मोरे , आनंदा पळसपगार , आर . आर . वानखडे . पातूर तालुका अध्यक्ष संतोष इंगळे , मुर्तिजापूर प्रतिनिधी सिध्दार्थ वानखडे ‘ बार्शिटाकळी प्रतिनिधी मनवर साहेब.प्रामुख्याने उपस्थित होते.