जालना: जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शिवप्रसाद महादेव थुटे या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या घटनेचा उलगडा केला. यामध्ये बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याने प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. शिवप्रसाद थुटे यांचे वडील महादेव थुटे याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीपासून जवळच असलेल्या मुरमा येथील शिवप्रसाद महादेव थुटे (वय १९) आणि त्याचे वडील महादेव थुटे यांच्यात नेहमी भांडण होत असे. २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिवप्रसाद थुटे यांनी स्वतःच्या घरातच चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं.ही आत्महत्या मराठा आरक्षणामुळे केल्याचं देखील दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं. याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी तीर्थपुरी पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तब्बल ७५ दिवसानंतर खुनाचे हे प्रकरण उघड झाले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं कारण दाखवून पित्यानेच खून केल्याचं उघड झाल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

Users Today : 19